Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २९ हजार ९६० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख २९ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत.
याशिवाय चांदीच्या किंमतीतही घट झाली असून आजचे दर १ लाख ८४ हजार ९०० रुपये प्रति किलोग्रॅम इतके आहेत. तुमच्या शहरातील सोन्याचे भाव काय? जाणून घ्या…
दिल्लीतील सोन्याचे दर
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचे किंमत १ लाख २९ हजार ९६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर २२ कॅरेट सोने १ लाख १९ हजार १४० रुपये प्रति १० ग्रॅम या इतका आहे.
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १८ हजार ९९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २९ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.
पुणे आणि बंगळुरू
या दोन्ही शहरांमध्येही २४ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख २९ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख १८ हजार ९९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
अमरावती
२४ कॅरेट सोन्याची किंमत १२,९८१ प्रति ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याची किंमत ११,८९९ प्रति ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ९,७३६ प्रति ग्रॅम आहे.
भिवंडी
२४ कॅरेट सोन्याची किंमत १२,९८४ प्रति ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹११,९०२ प्रति ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ९,७३९ प्रति ग्रॅम आहे.
जळगाव,कोल्हापूर,नागपूर,नाशिक
२४ कॅरेट सोन्याची किंमत १२,९८४ प्रति ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याची किंमत ११,९०२ प्रति ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ९,७३९ प्रति ग्रॅम आहे.