हवामान अपडेट: राज्यातील थंडीचा कडाका कायम..ईथे थंडीची लाट ; राज्यामध्ये सध्या थंडीचा कडाका कायम असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे किमान तापमान कमी झालेले आहे. मागील तीन दिवसांपासून थंडीची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस हा थंडीचा कडाका राज्यात कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी या वातावरणातील बदलांना अनुसरून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
या थंडीचा प्रभाव प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये अधिक जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये थंडीची लाटही अनुभवली गेली. तापमानाची नोंद पाहिल्यास, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे 8.8 अंश सेल्सिअस तापमान होते.














