थंडीच्या लाटेचा ईशारा ; राज्यातील हे जिल्हे गारठनार ; राज्यात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला आहे, ज्यामुळे बहुतांशी भागातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मागील आठवडाभर काहीशी कमी झालेली थंडी आता पुन्हा प्रभावी झाली असून अनेक भागांमध्ये थंडीने जोर पकडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आणि पुढील काही दिवसांसाठी राज्यातील काही भागांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
या थंडीच्या लाटेचा फटका प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणालाही बसनाय आहे. पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट अनुभवली गेली. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात झाली, जिथे तापमान ७.७ अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. याशिवाय, जेऊर येथे ९ अंश आणि अहिल्यानगर येथे ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.














