डिसेंबरमध्ये राज्यात पुन्हा पावसाचा ईशारा – तोडकर यांच्या अंदाजानुसार, मागील काही दिवसांत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले होते, मात्र पाऊस फक्त तुरळक भागांमध्येच झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडी बऱ्यापैकी पडली आहे. एकंदरीत, तोडकर यांच्या माहितीनुसार, १ डिसेंबरच्या संध्याकाळपासून थंडी पुन्हा पूर्वरत म्हणजेच हिवाळ्यातील सामान्य पातळीवर येण्याची अपेक्षा आहे. हे वातावरण केवळ सुमारे चार दिवसांसाठी (१ ते ४ डिसेंबर) स्पष्ट राहणार आहे.
पश्चिमी विक्षोभ (WD) आणि शेतकऱ्यांसाठी सल्ला चार दिवसांच्या स्पष्ट वातावरणानंतर, म्हणजेच ५ आणि ६ डिसेंबरला, परत एकदा पश्चिमी विक्षोभ (WD) मुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात सूर्यदर्शन कमी होईल. द्राक्ष उत्पादक शेतकरी किंवा इतर क्रिटिकल पिके असलेल्या शेतकऱ्यांनी फवारणीसह इतर आवश्यक कामे ५ डिसेंबरच्या आतमध्ये पूर्ण करून घ्यावीत. गहू पिकाला या वातावरणामुळे बुडक्यांचे किंवा तग नसल्याचे परिणाम जाणवू शकतात, त्यासाठी फवारणीची गरज असल्याचेही तोडकर यांनी नमूद केले आहे.














