चक्रीवादळ क्षमले,पण या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पाऊस, या तारखेपासून थंडी वाढनार.. मच्छिंद्र बांगर ; बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेले दित्वाह (Ditwah) चक्रीवादळ आता संपुष्टात आले असून त्याचा प्रभाव कमी झाला आहे. या चक्रीवादळाचा शेवटचा अंश पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात सरकेल. अरबी समुद्रात सरकण्यापूर्वी या अंशांमुळे दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, रायलसीमा आणि तेलंगणा या भागांमध्ये थोडे पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा या दक्षिणेकडील राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचा अंदाज
चक्रीवादळाचा उर्वरित अंश अरबी समुद्राकडे सरकत असल्यामुळे महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. या ढगाळ वातावरणाचा प्रभाव दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या (सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) काही पट्ट्यांत दिसून येईल.














